प्रियांका चोप्रा म्हणते, मला पंतप्रधान व्हायला आवडेल!

0
463

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह हॉलिवूडही गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडच्या या ‘देसी गर्ल’ला आता राजकारणात प्रवेश करायचा आहे. इतकेच नव्हे, तर तिला थेट आपल्या देशाचे पंतप्रधान व्हायच आहे. प्रियांकाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षांबद्दल सांगितले. ‘मला भविष्यात पंतप्रधानपद भूषवायला आवडेल’ असे ती म्हणाली. शिवाय, पती निक जोनस यानंदेखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

प्रियांकाने याच मुलाखतीत बोलताना हे स्पष्ट केले की, ‘एरव्ही मी किंवा निक राजकारणात फार रस घेत नाही. परंतु, हे जग बदलण्यासाठी, अधिक सुंदर बनवण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील असतो. त्यामुळे राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची एखादी संधी भविष्यात चालून आली तर नाही म्हणून चालणार नाही’