प्राधिकरण पोलीस चौकीत घुसून पोलीसाला मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

0
637

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – प्राधिकरण पोलीस चौकीत घुसून पोलीस नाईकाला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.८) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलीस नाईक एस.एल.बेबले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोहेल निसार शेख (वय १८, रा. ओम हार्डवेअर समोर, बिजलीनगर, चिंचवड) या तरुणाला अटक करण्यात आली असून आरोपी सोनु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास आरोपी सोहेल आणि त्याचा मित्र सोनु हे दोघे प्राधिकरण पोलीस चौकीत आले. त्यांनी तेथे गुन्ह्यांची कागदपत्रे तयार करणाऱ्या पोलीस नाईक एस.बेबले यांना, “माझी पल्सर गाडी का सोडत नाही”, असे विचारले. यावर बेबले यांनी, “मी तुझी गाडी आणलेली नाही तु साहेबांना भेट” असे म्हणाले. यामुळे रागावलेल्या सोहेल याने बेबले यांना शिवीगाळ करुन धमकावले. तसेच रस्त्यावर ढका देऊन मारहाण केली. याप्रकरणी सोहेल आणि त्याचा मित्र सोनु या दोघांवर सरकारी कामात अडथळी आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोहेल याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.