प्रसिद्ध मराठमोळे संगीतकार अजय-अतुल ‘फोर्ब्स ‘२०१९ च्या यादीत

0
448

मुंबई,दि.२३(पीसीबी) –  ‘फोर्ब्स’च्या २०१९ च्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित-नेने या दिग्गजांसह अजय-अतुल या मराठी संगीतकार जोडीने स्थान मिळवले आहे. या यादीत ते २२ व्या क्रमांकावर आहेत . अजय-अतुल यांची यंदाची कमाई ७७. ७१ कोटी रुपये आहे. मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपट संगीतक्षेत्रामध्येही या जोडीने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

यंदाच्या वर्षी अजय-अतुल यांनी ऋतिक रोशन, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा, रोहित शर्मा, अनुष्का शर्मा, वरुण धवन, आयुष्मान खुराणा अशी विविध क्षेत्रांतील मंडळी व दक्षिणेतील ‘स्टार’ महेश बाबू यांनाही मागे टाकले आहे. यंदा अजय-अतुल यांनी धडक, सुपर ३० , पानिपत आणि आगामी ‘तानाजी’ या हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे अजय-अतुल या जोडीचे बॉलिवूडमधील आपले स्थान अधिकच मजबूत झाले आहे.