प्रवासी कामगारांवरुन राजकारण तापले ; अमित शहांच्या पत्रावर ममता बॅनर्जीच्या पक्षाकडून प्रतिउत्तर; आरोप सिद्ध करा नाहीतर माफी मागा

0
387

प्रतिनिधी,दि.९ ( पीसीबी) : लाॅकडाऊनमुळे इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना पश्चिम बंगाल मध्ये परत घेऊन येणाऱ्या ट्रेन पश्चिम बंगाल रोखत असल्याचा आरोप अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात केला. पश्चिम बंगाल सरकारची ही कृती कामगारांवर अन्यायकारक असल्याचे अमित शहा यांनी पत्रात म्हणलं आहे. शहांच्या पत्रावर ममता बॅनर्जीच्या टीएमसी पक्षाकडून तातडीने प्रतिउत्तर देण्यात आले . पश्चिम बंगालच्या कामगारांना परत घेऊन येणाऱ्या ट्रेन आडवल्याचे केलेले आरोप सिद्ध करा अन्यथा राजिनामा द्या, असे आव्हान ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केले.

अभिषेक बॅनर्जी म्हटले कि, इतके दिवस गप्प बसल्यावर गृहमंत्री शहा आता खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. केंद्र शासनाने ज्या लोकांना देवाच्या भरोश्यावर सोडले होते अशा लोकांबद्दल शहा बोलत आहेत. संकटाच्या काळात आपल्या कर्तव्यात असफल झालेल्या शहांनी इतक्या आठवड्यांनंतर केवळ खोटे बोलण्यासाठी आपले तोंड उघडले आहे. अमित शहांनी आपले आरोप सिद्ध करावे अन्यथा राजिनामा द्यावा, असे बॅनर्जी म्हंटले.

पश्चिम बंगाल सरकारने प्रवासी कामगारांवर घेऊन येणाऱ्या ट्रेन रोखल्याने कामगारांवर अन्यायकारक असल्याचे अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणले होते. या वादात उडी घेत काॅंग्रसने म्हणले कि, असेच पत्र अमित शहा यांनी कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना लिहायला हवे होते. कारण त्याठिकाणी असलेले भाजपा सरकारने कामगारांना घरी परत येण्यापासून रोखले आहे. कशमीर पासून कन्याकुमारी पर्यंत कामगार घरी परतण्यासाठी प्रयत्न करत असताना इतके दिवस शहा चुप का बसले ? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.