प्रबोधनकारांच्या संपादकत्वाखालील पाक्षिक `प्रबोधन’चा शतकोत्सव सप्ताह आजपासून

0
284

पुणे, दि. २० (पीसीबी) – प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील पाक्षिक `प्रबोधन’चा शतकोत्सव सप्ताह कार्यक्रम आज बुधवार (२० जानेवारी २०२१) सायंकाळी ५ वाजले पासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरू होतो आहे, अशी माहिती संयोजन समितीचे प्रमुख हरिष केंची यांनी दिली.

●कलादालनात दिवसभर प्रबोधनकारांची, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, ●प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन
●प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’,
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने राज्यातील ७५ हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ व्यंगचित्रांचं प्रदर्शन सादरकर्ते ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर व इतर.
●प्रदर्शन कलादालनात दिवसभर सुरू राहील.

●उदघाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ. नितीन करमळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मा.मधुकर भावे यांच्या उपस्थितीत होईल.

गुरुवार दि.२१ जानेवारी २०२१ दुपारी ११ वाजता शतकोत्सवाचे उदघाटन बालगंधर्व रंगमंदिरात होईल. मा.सुभाषजी देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.नीलमताई गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद, मा.उदयजी सामंत, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.राजेंद्र पाटील येड्रावकर सांस्कृतिक राज्यमंत्री, मा.उर्मिला मातोंडकर, सिने अभिनेत्री आणि मा.बाळासाहेब दराडे, ज्येष्ठ उद्योजक, मा.डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ सत्यशोधक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होईल.

बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी २ वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण

●प्रबोधनकारांच्या ‘महामायेचे थैमान’ पुस्तकातील लेखाचे अभिवाचन: अभिनेते शिवराज वाळवेकर
●’प्रबोधन’वर व्याख्यान: मा.डॉ.विठ्ठल घुले
अध्यक्ष: मा.डॉ.सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत.
●’कर्मयोगी प्रबोधनकार’ टेलिफिल्मच्या पहिल्या भागाचे प्रक्षेपण
रंगमंदिरात संध्याकाळी ५ वाजता
राज्यातील महिला नेत्यांच्या प्रकट मुलाखती,
विषय: प्रबोधनकार आणि स्त्रीशक्ती
सहभाग-
●मा.नीलमताई गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
●मा.यशोमतीताई ठाकूर, महिला, बालकल्याण मंत्री
●मा.पंकजाताई मुंढे, माजी महिला व बालकल्याण मंत्री
●मा.शालिनीताई ठाकरे, महिला अध्यक्ष, मनसे
मुलाखतकार: ज्योती वाघमारे
———-
शुक्रवार दि.२२ जानेवारी २०२१
●कलादालनात प्रबोधनकारांची, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे,
●प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन
●प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’,
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यातील ७५ हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ व्यंगचित्रांचं प्रदर्शन सादरकर्ते ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर व इतर.
●प्रदर्शन आणि विक्री कलादालनात दिवसभर सुरू राहील
रंगमंदिरात दुपारी १२ वाजता
●प्रबोधनकारांचं ध्वनिमुद्रित भाषण
●प्रबोधनकारांच्या ‘दगलबाज शिवाजी’ पुस्तकातील संपादित लेख अभिवाचन: अभिनेते शंतनू मोघे
●’प्रबोधन’वर व्याख्यान: मा.डॉ.अनंत गुरव
अध्यक्ष : मा.उल्हासदादा पवार ज्येष्ठ विचारवंत
●’कर्मयोगी प्रबोधनकार’ टेलिफिल्मचे दुसऱ्या भागाचे प्रक्षेपण
रंगमंदिरात संध्याकाळी ५ वाजता राज्यातील प्रमुख युवा नेत्यांच्या प्रकट मुलाखती.
विषय: प्रबोधनकार ठाकरे आणि आजचे तरुण
सहभाग:
●मा.बच्चूजी कडू, जलसंपदा मंत्री
●मा.विश्वजितजी कदम, सहकार राज्यमंत्री काँग्रेस
●मा.सतेजजी पाटील, गृहराज्यमंत्री, आणि
●मा.रोहितजी पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.
●मा.मुरलीभाऊ मोहोळ, महापौर, पुणे भाजप
मुलाखतकार : सुधीर गाडगीळ.
—————-
शनिवार दि.२३ जानेवारी २०२१
●कलादालनात प्रबोधनकारांची, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे,
●प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन
●प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’,
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यातील ७५ हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ व्यंगचित्रांचं प्रदर्शन सादरकर्ते ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर आणि इतर.
●प्रदर्शन आणि विक्री कलादालनात दिवसभर सुरू राहील
रंगमंदिरात दुपारी १२ वाजता
●प्रबोधनकारांचं ध्वनिमुद्रित भाषण
●प्रबोधनकारांच्या ‘आई थोर तुझे उपकार’ पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन: ज्येष्ठ रंगकर्मी दिपक रेगे
●’प्रबोधन’ वर व्याख्यान: मा.डॉ.नवनाथ शिंदे
अध्यक्ष: मा.हरी नरके, महात्मा फुले वाड्मयाचे अभ्यासक
●’कर्मयोगी प्रबोधनकार’ टेलिफिल्मच्या तिसऱ्या भागाचे प्रक्षेपण रंगमंदिरात संध्याकाळी ५ वाजता
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले वडील प्रबोधनकारांच्या सांगितलेल्या आठवणी
‘पुत्र सांगती चरित पित्याचे…!’
ही १ तासाची ध्वनिचित्रफीत, याबाबत सांगतील चित्रलेखाचे संपादक मा. ज्ञानेश महाराव
उपस्थिती :
●मा.सुशीलकुमारजी शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
●मा.एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री,
●मा.संजयजी राऊत, खासदार, संपादक सामना.
—-–—-–————–
रविवार दि.२४ जानेवारी २०२१
●कलादालनात प्रबोधनकारांची, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे,
●प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन
●प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’,
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यातील ७५ हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ व्यंगचित्रांचं प्रदर्शन सादरकर्ते ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर व इतर.
●प्रदर्शन आणि विक्री कलादालनात दिवसभर सुरू राहील
रंगमंदिरात दुपारी १२ वाजता
●प्रबोधनकारांचं ध्वनिमुद्रित भाषण
●प्रबोधनकारांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ पुस्तकाचे अभिवाचन: शिवव्याख्याते मा.नितीनजी बानगुडे पाटील
●’प्रबोधन’वर व्याख्यान: डॉ.मनिष देशमुख
अध्यक्ष: मा.प्रवीणदादा गायकवाड, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड
●’कर्मयोगी प्रबोधनकार’ दूरदर्शन मालिकेच्या चौथ्या भागाचे प्रक्षेपण
रंगमंदिरात संध्याकाळी ५ वाजता
●नाटकांची प्रबोधनकारी नांदी
केशव सीताराम ठाकरे कृत नाट्यपंचक
सादरकर्ते :
‘प्रतिगंधर्व’ विक्रांत आजगावकर (मुंबई)
आणि ज्ञानेश महाराव
‘पावनखिंड’ आणि ‘विजयादशमी’ पोवाडे सादरकर्ते : शाहीर डॉ. आझाद नायकवडी व सहकारी (कोल्हापूर)
—————-
सोमवार दि.२५ जानेवारी २०२१
●कलादालनात प्रबोधनकारांची, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे,
●प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन
●प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’,
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यातील ७५ हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ व्यंगचित्रांचं प्रदर्शन सादरकर्ते ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर व इतर.
●प्रदर्शन आणि विक्री कलादालनात दिवसभर सुरू राहील
रंगमंदिरात दुपारी १२ वाजता
●प्रबोधनकारांचं ध्वनिमुद्रित भाषण
●प्रबोधनकारांच्या ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य’ पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन: ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर
●प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक ज्येष्ठ पत्रकार मा.सचिनजी परब यांचा सत्कार आणि व्याख्यान
अध्यक्ष : मा.सुभाषजी वारे, अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल
●’कर्मयोगी प्रबोधनकार’ दूरदर्शन मालिकेच्या पाचव्या भागाचे प्रक्षेपण
रंगमंदिरात संध्याकाळी ५ वाजता
●प्रबोधनकारांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही ध्वनिचित्रफितीचं प्रक्षेपण.
●श्रेयस बडवे यांचे प्रबोधनविषयावर कीर्तन
—————-
मंगळवार दि.२६ जानेवारी २०२१
●कलादालनात प्रबोधनकारांची, शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे,
●प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन
●प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’,
●शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यातील ७५ हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ व्यंगचित्रांचं प्रदर्शन सादरकर्ते ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर व इतर.
●प्रदर्शन आणि विक्री कलादालनात दिवसभर सुरू राहील
रंगमंदिरात दुपारी १२ वाजता
●प्रबोधनकारांचं ध्वनिमुद्रित भाषण
●प्रबोधनकारांच्या ‘ऊठ मराठ्या ऊठ’ पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी
●सत्यशोधकांचे प्रबोधनकार व्याख्यान: मा.गंगाधर बनबरे
अध्यक्ष: मा.शमशुद्दीन तांबोळी, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
●’कर्मयोगी प्रबोधनकार’ दूरदर्शन मालिकेच्या सहाव्या भागाचे प्रक्षेपण
संध्याकाळी ५ वाजता रंगमंदिरात
प्रबोधन शतकोत्सव सोहळ्याचा समारोप
●मा.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री
●मा.मुरलीभाऊ मोहोळ, महापौर, पुणे
●मा.गिरीशजी बापट, खासदार यांच्या उपस्थितीत
●मा.डॉ.दिलीपजी पांढरपट्टे, सचिव, महासंचालक, जनसंपर्क विभाग महाराष्ट्र राज्य.
बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ७ वाजता
●प्रबोधन विषयक कवी संमेलन : मा.रामदास फुटाणे आणि त्यांचे कविवर्य मित्र