पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि गळा दाबला – प्रियंका गांधी

0
417

नवी दिल्ली, दि.२९ (पीसीबी) – पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि गळा दाबला असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला आहे. पोलिसांनी मला घेराव घातला, त्यानंतर मला धक्काबुक्की केली तसंच माझा गळा दाबला असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. महिला पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले असंही त्यांनी म्हटले आहे.