पेब किल्ल्यावर मुंबईतील ११ तरुणांना शिवभक्तांनी कपडे काढून चोपले

0
528

मुंबई, दि.२ (पीसीबी) – माथेरानमधील पेब किल्ल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरु असलेली दारु आणि गांजा पार्टी स्थानिक तरुणांनी आणि शिवभक्तांनी उधळून लावल्याची घटना समोर आली आहे. 

मुंबईमधील काही तरुण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पेब किल्ल्यावर गेले होते. मात्र या तरुणांनी किल्ल्यावर मद्यपान आणि गांजाचे सेवन केले. हे तरुण नशेमध्ये गडावर धांडधिंगा करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी आणि शिवभक्तांनी त्यांना चोप दिला. १ डिसेंबर रोजी मुंबईतील ११ तरुण पेब किल्ल्यावर गेले होते. मात्र किल्ल्यावर जाताना त्यांनी स्वत:बरोबर दारुच्या बाटल्या आणि नशा करण्यासाठी अंमली पदार्थही नेले होते. या तरुणांनी रात्री मद्यपान करुन नशेच्या वस्तूंचे सेवन केले आणि ते किल्ल्यावर गोंधळ घालू लागले. याची माहिती मिळताच शिवभक्तांनी किल्ल्यावर धाव घेतली. नशेत असणाऱ्या या तरुणांना पकडून आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचे काम या शिवभक्तांना करावे लागले. त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना माफी मागायला लावली. अक्षय भोसले, किरण नागडा, राहुल नाहीर, ऋषी शहा, मानस अग्रवाल, मिलिंद राठोड, वैभव बोहरी, दीप ताऱ्या, संजय चांदवाणी, इशांत ठक्कर, ऋषभ शेठ अशी या नशा करणाऱ्या तरुणांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.