पुण्यात पोटच्या तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप, तर आईला सात वर्ष सक्त मजूरी

0
3062

पुणे, दि. १ (पीसीबी) – पोटच्या तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम भापाला पुणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तर नवऱ्याची ही क्रूरता माहिती असूनही, त्याला पाठीशी घालणाऱ्या त्याच्या पत्नीलाही सात वर्ष सक्त मजूरी आणि पाच हजारांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बलात्काराच्या घटना २०१० ते २२ एप्रिल २०१५ या कालावधीत कोंढवा परिसरात घडली होती. आरोपी पित्याने २२, १९ आणि १५ वर्षांच्या स्वतच्याच तीन मुलींवर बलात्कार केला. याबाबत कोणाला न सांगण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र, १५ वर्षीय मुलीने याबाबत ओळखीच्या महिलेला सांगितले होते. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. शिक्षा झालेला आरोपी बाप ४५, तर आई ४० वर्षांची आहे. हे कुटुंबीय कोंढवा भागात राहत असून, मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी गुरूवारी (दि.३१ जानेवारी) हा निकाल दिला.