पुण्यातील टिळक रोडवरील फ्लॅटला भीषण आग

0
841

पुणे, दि. १० (पीसीबी) – टिळक रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये आज (बुधवार) सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग झपाट्याने पसरत गेल्याने काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या आगीत बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.