पुण्यातील अमित शहांचे आव्हान शरद पवार स्वीकारणार का?    

0
1382

पुणे, दि. ९ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी  त्यांच्या सरकारमधील  कृषीमालाची आकडेवारी जाहीर करावी, आम्ही आमच्या सरकारच्या काळातील सांगतो. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या गोष्ट करतात. मात्र, त्यांना बटाटा जमिनीच्या खाली येतो की वर हे कळत नाही, असे  टीकास्त्र  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शनिवार) येथे सोडले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी  शक्तिकेंद्र प्रमुख, बुथकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला मागदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, यांच्यासह खासदार, आमदार, पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधकांचे महागठबंधन वगैरे काही नाही, उत्तर प्रदेश सोडता कोणतीही नवीन आघाडी झालेली नाही. मी उत्तर प्रदेशच्या सर्व भागाला ओळखतो. त्यामुळे ७२ च्या ७४ जागा होतील, एकही जागा कमी होणार नाही, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला.