पुणे शहरात दिवसभरात 320 पाॅझिटिव्ह रुग्ण

0
553

पुणे, दि.14 (पीसीबी): पुणे शहरातील कोरोना रुग्णाची रोज होत असलेली वाढ आता हाताबाहेर गेली आहे. रविवारी (14जून) दिवसभरात तब्बल 320 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले. फक्त 123 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

पुण्यात नऊ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून २०३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ९६५६ असून त्यातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल मध्ये ९००३ आणि ससून ६५३ आहेत.

पुण्यातील एकुण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २९९८ पर्यंत तर एकूण मृत्यू ४४८ पर्यंत झाले आहेत.
आजपर्यंतच एकूण ६२१० रुग्णाना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी २१३ आहेत.