पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 25 हजार 701 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

0
213

पुणे,दि.23 :- पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 25 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 981 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 792 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 36 हजार 210 रुग्णांपैकी 3 लाख 17 हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 42 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.58 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 732 रुग्णांपैकी 47 हजार 73 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 978 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 369 रुग्णांपैकी 40 हजार 829 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 972 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 474 रुग्णांपैकी 44 हजार 379 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 406 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 916 रुग्णांपैकी 46 हजार 662 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 583 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1253 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 785 , सातारा जिल्ह्यात 166, सोलापूर जिल्ह्यात 229, सांगली जिल्ह्यात 52 तर कोल्हापूर जिल्ह्यात 21 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 826 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 597, सातारा जिल्हयामध्ये 20, सोलापूर जिल्हयामध्ये 131, सांगली जिल्हयामध्ये 53 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 25 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 18 हजार 720 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 25 हजार 701 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.