पुणे विभागातील 4 लाख 79 हजार 622 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 5 लाख 11 हजार 339 रुग्ण

0
218

पुणे, दि. 08 :- पुणे विभागातील 4 लाख 79 हजार 622 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 11 हजार 339 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 326 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 391 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.80 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 27 हजार 566 रुग्णांपैकी 3 लाख 8 हजार 728 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 862 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 976 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.25 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 754 रुग्णांपैकी 43 हजार 638 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 513 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 860 रुग्णांपैकी 38 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 241 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 494 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 715 रुग्णांपैकी 43 हजार 076 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 976 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 444 रुग्णांपैकी 46 हजार 055 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 734 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 848 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 441, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 150, सांगली जिल्ह्यात 76 तर कोल्हापूर जिल्ह्यात 36 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 292 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 772 ,सातारा जिल्हयामध्ये 150, सोलापूर जिल्हयामध्ये 165, सांगली जिल्हयामध्ये 164 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 41 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 96 हजार 559 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 11 हजार 339 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 7 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )