पुणे जिल्ह्यामध्ये होमगार्ड होण्याची संधी

0
556

पुणे, दि. २३ (पीसीबी) – होमगार्ड संघटनेच्या पुणे जिल्ह्याकरिता मंजुर करण्यात आलेली लक्षसंख्य पूर्ण करण्यासाठी ७ मार्च २०१९ रोजी चव्हाणनगर पाषाण येथे होमगार्डसाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली होती. मात्र नावनोंदणीला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि वेळेअभावी बऱ्याच उम्मेदवारांना याचा लाभ घेताना आला नाही.

अशा सर्व उम्मेदवारांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांनी पुन्हा नाव नोंदणीची संधी दिली आहे. या बाबतचा आदेश त्यांनी जाहिर केला आहे. यामध्ये ७ मार्च २०१९ रोजी चव्हाणनगर पाषाण येथील नावनोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ज्या उम्मेदवारांना वेळेअभावी नाव नोंदणी करता आली नाही. त्या नागरिकांना १२ मार्च रोजी पुन्हा उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्यामुळे नावनोंदणीचा कार्यक्रम हा ३० जुलै रोजी सकाळी सात पासून पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण, चव्हाणनगर पाषाण येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

यामुळे ज्या उम्मेदवारांकडे नोंदणीचा गोल सिल शिक्का असलेला मुळ अर्ज आहे. त्या उम्मेदवारांनीच मुळ प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घेऊन चव्हाणनगर पाषाण येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.