पिंपळेसौदागरमध्ये नाना काटे सोशल फाऊंडेशनकडून ई-स्कूटर सेवेचा श्रीगणेशा

0
344

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्त पिंपळेसौदागरसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ई-स्कूटर सेवेला शुक्रवारी (दि. ८) सुरूवात करण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे, नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.