पिंपळेसौदागरमध्ये नगरसेविका निर्मला कुटेंच्या हस्ते गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

0
707

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनीक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पिंपळेसौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात आयोजित गोवर व रुबेला रोगावरील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन भाजप नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेविका कुटे यांच्या हस्ते लहान मुलांना लसीकरणाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तीरूमनी, डॉ. शिवाजी ढगे, पद्मा जगताप, शोभा ढोले, ज्योती शिंदे, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

नगरसेविका कुटे व नगरसेवक काटे यांनी गोवर व रुबेलावर मात करून जबाबदार पालक व्हा व आपल्या ९ महिने ते १५ वर्षाच्या आतील बालकांना हे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन नागरिकांना केले.