पिंपरी महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी ‘स्थायी’पुढे सादर होणार

0
213

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महापालिकेचा सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेदहा वाजता स्थायी समितीला सादर करणार आहेत. पिंपरी महापालिकेचा हा ३९ वा तर नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांचा हा पहिला अर्थसंकल्प असेल. कोरोना महामारीमुळे खालावलेले आर्थिक उत्पन्न, नव्या उत्पन्न स्त्रोतांचा अभाव यांमुळे आयुक्तांच्या पोतडीत कोणते नवीन प्रकल्प, योजना असतील, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत सत्तारुढ झाल्यानंतर भाजपतर्पेâ सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षाचा चौथा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्थायी समितीमार्पâत चर्चा करून अर्थसंकल्प मंजुर करण्यात येईल. त्यानंतर तो महापालिका विशेष सभेपुढे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. अर्थसंकल्पात जेएनएनयुआरएमसह स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत योजनांचा समावेश आहे.

आगामी अर्थसंकल्पात शून्य तरतूद असलेले सर्व लेखाशिर्ष वगळण्यात येणार आहेत. जेवढ्या रकमेचे काम आहे, तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवण्याचे बंधनकारक आहे. सध्या सुरु असलेल्या विकास कामांसाठी १०० टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्याला सढळ हाताने निधी दिला जाणार आहे. अर्थसंकल्प तयार होईपर्यंत, जेवढ्या वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) दिले आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यासाठी लागणाNया रकमेची तजवीज करण्यात आली आहे.

देखभाल – दुरुस्तीसाठी जेवढी तरतुद सुचविण्यात आली आहे, तेवढ्या रकमा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शून्य तरतूद अथवा ‘टोकन हेड’ ला मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्याच कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या निर्णयांमुळे महापालिकेला आर्थिक शिस्त लागेल अशा दावा केला जात आहे. महापालिकेने २०२१ – २२ या आर्थिक वर्षासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.