कट,कॉपी ,पेस्ट पर्यावरण अहवालाची रयत विद्यार्थी परिषदेने केली होळी

0
433

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सादर केलेला पर्यावरण सद्यस्थिती अहवाल कट, कॉपी, टेस्टच्या पलिकडे काही नसून हा फक्त सादर करायचा आहे म्हणून सादर केलेला अहवाल आहे.दरवर्षी एकाच संस्थेकडून अहवाल बनवला जातो.त्यामुळे कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे या पर्यावरण अहवालात काही नाही, असा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने केला आहे.

पर्यावरण जतन व संवर्धनासाठी कोणत्याही प्रकारची ठोस भुमिका न घेता विविध विभागांकडून आकडेवारी घेणे व त्या आकडेवारी मध्ये थोडासा बदल करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो.जुन्या अहवालामध्ये वापरलेले फोटो देखील बदलले जात नाहीत सारखेच असतात. पाणी प्रदुषण, ध्वनी प्रदुषण,वायू प्रदूषण , मृदा प्रदूषण याबाबतचे नमुना परिक्षण करताना कोणत्या ठिकाणचे नमुने घेतले, किती वेळा घेतले याचा उल्लेख नाही.मागिल वर्षी व या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत कट , कॉपी, पेस्टच आहे असे दिसते.त्यामुळे संबंधित एजन्सीस काळ्या यादीत टाकण्यात यावे. रयत विद्यार्थी परिषद महापालिका भवनासमोर पर्यावरण अहवालाची होळी करण्यात आली. यावेळी रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, ओमकार भोईर,अजय चव्हाण ,हर्षद बनसोडे, निरज प्रजापती उपस्थित होते.