पिंपरी चिंचवड ला 546 कोरोना बाधित? आज 17 मृत्यू

0
341

पिंपरी, दि.16 (पीसीबी): – पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील 501 आणि शहराबाहेरील 46 अशा 547 जणांना गुरुवारी कोरोनाची लागण झाली, असे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 324  जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या नऊ हजार पार झाली असून ही संख्या 9104 वर पोहोचली आहे.
आज एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहननगर- चिंचवड येथील 63 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 65 वर्षीय महिला, आकुर्डीतील 25 वर्षीय युवक, मिलिंदनगरमधील 63 वर्षीय महिला, चिंचवडयेथील 76 वर्षीय वृद्ध, नवी सांगवीतील 70 वर्षीय वृद्ध,  थेरगांवतील 65 वर्षीय पुरुष, तळवडेतील 64 वर्षीय महिला, मोशीतील 65 वर्षीय महिला, निगडीतील 73 वर्षीय वृद्ध महिला  आणि 59 वर्षीय पुरुष,  यमुनानगरमधील 76 वर्षीय वृद्ध महिला, चिंचवड येथील 48 वर्षीय पुरुष आणि  चाकण येथील 57 वर्षीय पुरुष, तळेगाव रोड येथील 58 वर्षीय पुरुष, कात्रजमधील 77 वर्षीय वृद्ध, महाबळेश्वर येथील 77 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात आजपर्यंत 9104 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 5559  जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 156 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 49 अशा 205 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2337 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.