पिंपरी चिंचवडमध्ये आता ‘या’ हॉस्पिटलमध्ये १२ तास ‘Rapid Antigen Tests’

0
262

पिंपरी,दि.२० (पीसीबी) :- भारत सरकार तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू करुन राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकरिता युध्दपातळीवर कामकाज करण्यात येत आहे.

शासनाने सुचित केल्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांची कोविड-१९ ची तपासणी Rapid Antigen Tests तपासणी करणेकरीता शासन मार्गदर्शक सूचनांनुसार नमुने तपासण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील केंद्रावर आहे. सदर केंद्रावर करण्यात येणा-या तपासणीची वेळ खालील प्रमाणे वाढविण्यात आलेली आहे.

तपासणी केंद्राचे नांव व पत्ता Rapid Antigen Tests तपासणी वेळ
-यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर पिंपरी-१७ सकाळी – ८.०० ते रात्री- ८.००
-जुने जिजामाता रुग्णालय, कमला नेहरु मराठी शाळे जवळ, पिंपरी-१८ सकाळी – ८.०० ते रात्री- ८.००
– आर.टी.टी.सी सेंटर, बी.एस.एन.एल ऑॅफिस, संभाजीनगर सकाळी – ९.०० ते रात्री- ९.००

कोविड-१९ तपासणी केंद्रावर निश्चित केलेल्या वेळेमध्ये Rapid Antigen Tests ची सुविधा पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात येते की, सदर सेवेचा जास्तीत जास्त लाभ पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांनी घ्यावा.