दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला; आणि चक्क चोरून नेल्या ‘या’ वस्तू

0
391

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे बुधवारी (दि. १९) सायंकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एलसीडी टीव्ही, सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत परमेश्वर कल्याणी गायकवाड (वय ३३, रा. मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांचे घर आठ मे रोजी रात्री साडेआठ ते १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून एलसीडी टीव्ही, सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.