पावसामुळे भारत- न्यूझीलंड सामनाच झाला नाहीतर ‘हा’ संघ जाणार अंतीम फेरीत

0
632

नवी दिल्ली, दि, ८ (पीसीबी) – विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना जुलै रोजी मॅन्चेस्टर येथे भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये रंगणार आहे. सध्या क्रीडा वर्तुळात भारत आणि न्यूझीलंड या सामन्याची खमंग चर्चा रंगली आहे. पण, हवामान विभागाने मंगळवारी मॅन्चेस्टरमध्ये पावस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण सुरूवातीलाच साखळी फेरीतील अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे समजताच चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

 

क्रिकेटचा इतिहास पाहिल्यास २०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक सामने पावसामुळे धुतले गेले आहेत. ऐवढे सामने याआधी कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत रद्द झाले नाहीत. विश्वचषकात पावसामुळे सामने रद्द झाले त्याचा फटका गुणतालिकेत अनेक संघाना बसला आहे. आता विश्वचषकाच्या अंतिम टप्यात पुन्हा एकदा पावसाने खोडा घातल्यास चाहत्यांना राग येणं स्वभाविकच आहे. उपांत्य फेरीत जर पावसाने खोडा घातला तर काय होईल ? असा प्रश्न प्रत्येक क्रीडा प्रेमींना पडला असेल. याचेच उत्तर आम्ही घेऊन आलो आहेउपांत्य फेरीत पावासाने हजेरी लावल्यास दोन पर्याय आहेत. जाणून घेऊयात उपांत्य फेरीत पाऊस पडल्यास काय विकल्प आहेत.

 

मंगळवारी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना धुतला गेला. तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी होऊ शकतो. साखळी फेरीत राखीव दिवस नव्हता मात्र, उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे मॅन्चस्टरमध्ये मंगळवार आणि बुधवारी पावसाची शक्यता सांगितली आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे. जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर आयसीसीच्या नियमांनुसार भारतीय संघ अंतिम फेरीत धडक मारेल. साखळी फेरीत ज्या संघाचे सर्वाधिक गुण असतील तो संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल असा आयसीसीचा नियम आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास भारत अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी पाऊस आला तर भारत अंतिम फेरीत पोहचेल.