पाकिस्तानकडून गझनवी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

0
663

कराची, दि. २९ (पीसीबी) – पाकिस्तानने आज पहाटे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या गझनवी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण केली आहे. अण्वस्त्रासह विविध वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम असलेल्या गझनवीची २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे.

गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो, असे जाणकारांचे म्हणने आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी टि्वट करुन चाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराने या चाचणीचा ३० सेकंदाचा व्हिडिओ देखील टि्वट केला आहे.

पाकिस्तानने या चाचणीआधी नोटॅम जारी केला होता. तसेच कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.