पाकच्या ताब्यातील भारताच्या वैमानिकाचे व्हिडिओ शेअर करू नका  

0
589

श्रीनगर, दि. २८ (पीसीबी) –  पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल  करुन पाकिस्तान हा भारताविरुद्ध मानसिक खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सुरक्षा यंत्रणांनी  म्हटले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे नेटिझन्सनी थांबवावे, असे आवाहन  करण्यात  आले आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून पाच व्हिडिओ चित्रित करण्यात आले आहेत. ‘सायकॉलॉजिकल ऑपरेशन’ अर्थात मानसिक दबाव आणण्यासाठी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत, असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले.

सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांचे मनोधैर्य कमी करण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे, असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. विंग कमांडरला पाकिस्तानने बंदीवान केल्यानंतरचे व्हिडिओ भारतात अनेक नेटिझन्सनी शेअर केले आहेत. तर पाकिस्तानी सैन्य आणि मीडियाकडून हे फोटो जाणूनबुजून पसरवले जात असल्याची  माहिती समोर आली आहे.