पवना धरणातून ५५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
783

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मावळात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार कायम असल्याने  पवना धरण आज (शनिवार) ९८ टक्के भरले  असून धरणातून  ५५५० क्युसेकस विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवना नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिंपरी-चिंचवड शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.  

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  मुसळधार  पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज सकाळी  ६ वाजता १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर  ११:३० वाजता वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक विसर्ग   करण्यात आला.  धरणाचे सहा दरवाजे अर्ध्याफुटाने उचलून  २२०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. दुपारी १२:३० च्या सुमारास धरणाचे धरवाजे एक फुटाने उचलुन धरणातून ४२००  क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. तर सध्या वीज निर्मितीद्वारे व सांडव्यावरुन ५५५०  क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.

दरम्यान, पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून पवना नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीच्या गावांना सतर्कतेची इशारा देण्यात आला. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता आत्पकालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.