पवना जलवाहिनी प्रकल्पातील पाईप्स एकत्रित करण्यासाठी ८० लाखांच्या निधीची गरज   

0
771

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची बंदिस्त पवना जलवाहिनी योजना आठ वर्षानंतर  रद्द करण्यात आली आहे. या जलवाहिनीसाठी २६ किलोमीटर अंतरावर टाकलेल्या सर्व पाईप्स एकत्रित करण्यास अतिरिक्त ८० लाखांहून अधिक निधी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.

या पाईप आता भामा-आसखेड किंवा चिखली जलशुध्दीकरण केंद्राच्या कामात वापरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेने पवना जलवाहिनी प्रकल्पासाठी आतापर्यंत १२३ ते १२५ कोटी खर्च केले आहेत. आता ही रक्कम वाया जाणार आहे.

शासनाची स्थगिती आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे आठ वर्षानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने महापालिकेला नोटीस देऊन काम बंद करण्याची परवानगी मागितली होती. यावर महापालिकेने ही योजना रद्द केली. आता या प्रकल्पातील पाईप एकत्रित करून दुसऱ्या प्रकल्पासाठी हे पाईप वापरण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर आला आहे.