पत्रे उचकटून कंपनीत प्रवेश केला आणि ‘एवढ्या’ लाखांचा माल चोरीला

0
211

चाकण, दि. १४ (पीसीबी) – कुरूळी येथील कॅटॅलिक राॅबॅटिक्स अॅंड ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 40 हजारांची चोरी केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली. वासाप्पा यल्लाप्पा माळोदे (वय 73, रा. हडपसर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुरूळी येथील कॅटॅलिक राॅबॅटिक्स अॅंड ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी सात वाजताच्या कालावधी अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीचे कपाट आणि डायरेक्टर केबिनचे दरवाजे तोडून, सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यांचे नुकसान केले. तसेच कंपनीमधून चार लॅपटॉप, काॅपर फिटिंग, ब्राॅस फिटिंग, काॅपर ट्यूप असा एकूण तीन लाख 40 हजार 931 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.