पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत दोषी, ईडी चे आरोपपत्र दाखल

0
226

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत. कालच संजय राऊत यांच्यावर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, आता किमान दोन वर्षे संजय राऊत ईडी कोठडितून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे, असे सुत्रांनी सांगितले.गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही यात म्हणटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.