पत्रकार दिनाच्या दिवशीच पत्रकाराचा इमारतीवरुन पडून मृत्यू

0
614

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – पत्रकार दिनाच्या दिवशीच मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या आदर्श मिश्रा या पत्रकाराचा त्यांच्या राहत्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आदर्श मिश्रा हे मुंबईतील पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार होते.

आज (रविवार) सकाळी गोरेगाव मधील सिद्धार्थ नगरात राहणारे आदर्श मिश्रा हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र, इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र हा घातपात आहे कि आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.