पत्नीला मारहाण करून कोयत्याने मारण्याची धमकी; पतीवर गुन्हा दाखल

0
253

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पत्नीला मारहाण करून कोयत्याने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भाजी मंडई समोर भीमनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 4) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

अमृता नरेंद्र वाल्हेकर (वय 23, रा. मिलिंद नगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे पती नरेंद्र राजू वाल्हेकर (वय 27, रा. भीमनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृता या त्यांच्या आईच्या घरातून त्यांच्या बहिणीकडे पायी भाटनगरकडे जात होत्या. त्यावेळी पिंपरी पुलावर आरोपी हा फिर्यादी जवळ आला. तू आपल्या घरी चल, असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी नेले. तेथे आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादीच्या उजव्या हातावर दगडी पाटा मारून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या डोक्याचे निम्मे केस कात्रीने कापून फिर्यादीला कोयत्याने मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.