पतीला ‘दारू पिऊन का आला’ असे विचारल्याच्या कारणावरून पत्नीला लाटण्याने मारहाण

0
260

मोशी, दि. १३ (पीसीबी) – पतीला दारू पिऊन का आला असे पत्नीने विचारले. या कारणावरून पतीने पत्नीला लाकडी लाटण्याने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री बो-हाडेवाडी, मोशी येथे घडली.

सोनम तेजस बो-हाडे (वय 24, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस शिवाजी बो-हाडे (वय 24) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी तेजस शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. त्यामुळे पत्नी सोनम यांनी ‘दारू पिऊन का आला’ असे विचारले. या कारणावरून तेजस याने सोनम यांना बुक्की मारली. तसेच लाकडी लाटण्याने कपाळावर मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.