पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

0
498

दापोडी, दि. ११ (पीसीबी) – चारित्र्यावर संशय घेऊन छळ करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका २१ वर्षीय विवाहितेने औषधांचा ओवरडोस घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दापोडीतील रेल्वेगेट शेजारील बहिरट चाळ येथे घडली.

याप्रकरणी २१ वर्षीय पिडितेने भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.१०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सनी दिनेश मुदलीयार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८ मध्ये विवाह झाल्यापासून सनी २१ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. तसेच तिला बदनामीची धमकी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. या त्रासाला कंटाळून पिडितेने राहत्या घरात औषधांचा ओवरडोस घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न. मात्र वेळेत तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. पोलीस उपनिरीक्षक बीरुदेव काबुगडे तपास करत आहेत.