पण अखेरच्या सामन्यातही पराभवच…

0
240

बडोदा,दि.१९(पीसीबी) – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या मोसमातील सईद मुश्ताक अली टी २० स्पर्धेत क गटातील आपल्या अखेरच्या सामन्यातही महाराष्ट्राच्या पदरी पराभवच पडला. हिमाचल प्रदेशने त्यांचा ४ गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने आज संघात अनेक बदल केले. अनुभवी खेळाडूंसह काही उदयोन्मुख खेळाडूंनाही त्यांनी संधी दिली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. राहुल त्रिपाठीच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा (३३) अपवाद वगळता महाराष्ट्राचा अन्य कुठलाही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. निर्धारित २० षटकांत त्यांचा डाव ९ बाद ११७ असा मर्यादित राहिला. हिमाचल प्रदेशाच्या रिषी धवनने ३,तर पंकज जैस्वालने २ गडी बाद केले.

आव्हानाचा पाठलाग करताना हिमाच प्रदेशाची सुरवात चिंताजनक होती. नवोदित तरणजितने पहिल्याच षटकातीर तिसऱ्या चेंडूवर त्यांची सलामीची जोडी फोडरी. त्याने अभिमन्यू राणाला बाद केले. त्यानंतर चौथ्या षटकांत प्रदीप दाढेने लागोपाठच्या चेंडूवर रवी ठाकूर आणि एकांत सेन यांना बाद केले. पाचव्या षटकांत अझिम काझीने मणी शर्माचा अडसर दूर केला. सत्यजित बच्छावच्या फिरकीने दिग्विजय रंगीला चकवले आणि हिमाचल प्रदेशाचा डाव ८.२ षटकांत ५ बाद २६ असा अडचणीत आला. त्या वेळी रिषी धवन आणि नितीन शर्मा एकत्र आले. पण, धावांची गती वाढवण्याच्या नादाक नितीन बाद झाला.

दरम्यान हिमाचल प्रदेश ६ बाद ५० असा अडचणीत आरा असताना रिषी धवन आणि आयुष जमवाल या जोडीने तुफानी फटकेबाजी करत महाराष्ट्राच्या हातून सामना काढून घेतला. या जोडीने ३८ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. रिषी धवन ४८ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह ६१ धावा काढून नाबाद राहिला. आयुषने १४ चेंडूत नाबाद २७ धावांची खेळी केली.