पंतप्रधान मोदींचा पुन्हा विदेश दौरा सुरू; ‘या’ दोन देशाना देणार भेटी  

0
456

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) –  केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान  मोदी आज पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत.  त्यांचा हा दोन देशांचा दौरा असणार आहे. आज (रविवार) मोदी मालदीवला जाणार आहेत. त्यानंतर रविवारी(दि.९)  मोदी श्रीलंकेला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. त्यासाठी मालदीवच्या संसदेने संमती दिली आहे.

मालदीवच्या संसदेचे स्पीकर आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी सांगितले की,  मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीच्या संसदेला संबोधित करण्याचे आमंत्रण  दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २०१८ मध्ये इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधीला हजेरी लावली होती. त्यानंतर आता मोदी पुन्हा एकदा मालदीव दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी २०११ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीदेखील मालदीव दौरा केला होता.

२०१४ साली पंतप्रधान मोदींनी भुतानपासून परदेश दोऱ्यांना सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे मोदी यंदादेखील ‘पडोसी पहले’ या तत्वानुसार भारताच्या शेजारच्या देशाला सर्वप्रथम भेटी देत आहेत.