पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाने केला विक्रम

0
364

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक भाषणाचे वेगळेपण असते. निवडणूक प्रचारातील त्यांची भाषणे, मन की बात मधील त्यांचा संवाद असे अथवा कार्यक्रमातील त्यांचे भाषण असो लोक मन लावून ऐकतात. विदेशातील त्यांच्या भाषणांचा विक्रम हा सुध्दा आता स्वतंत्र विषय आहे. प्रत्येक स्वातंत्र दिनाला होणारे त्यांचे भाषण हे आपला देश कुठे आहे, कुठे जाणार याचा लेखाजोखा असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर भाषण १३ कोटी ३० लाख लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओने त्यांच्या मागच्या भाषणाचेही विक्रम मोडले आहे. मागील पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर भाषण १० कोटी ९० लाख लोकांनी पाहिले होते.  पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर भाषण २०१८ मध्ये १२ कोटी १० लाख लोकांनी पाहिले होते. या वर्षी पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरील भाषण १५२ वाहिन्यांनी लाईव्ह दाखवले होते. लाल किल्ल्यावरील हा कार्यक्रम सोहळा चार अब्ज ६० कोटी Viewing मिनिट पाहिला गेला.

सध्या कोरोनाच्या संकटामुळे लोक घरी असल्यामुळे हा आकडा अधिक आहे. याआधी जेव्हा नरेंद्र मोदी राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला गेले होते, तेव्हा तो कार्यक्रम १६ कोटी ३० लाख लोकांनी पाहिला होता. हा कार्यक्रम ७ अब्जापेक्षा अधिक Viewing मिनिट पाहिला गेला.