पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा

0
1531

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावावर सर्वसंमती होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत गडकरींनी आपण स्वप्न पाहत नाही, जे लोक मला जवळून ओळखतात, त्यांना हे माहित आहे, असे गडकरी म्हणाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरी म्हणाले की, २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील. आपण पंतप्रधानपदाच्य शर्यतीत नाही,  असे  त्यांनी स्पष्ट करून पंतप्रधानपदाच्या  शर्यतीत आपले नांव असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

गेल्या पाच वर्षात राहुल गांधींनी केलेल्या प्रगतीचे तुमच्यावर दडपण येते का ? आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींसमोर आव्हान आहे का ? या प्रश्नावर त्या दोघांमध्ये तुलना होऊच शकत नाही. आम्ही २०१९ लोकसभा निवडणुकीत नक्कीच विजय मिळवू,  असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.