पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता – धनंजय मुंडे

0
602

महाराष्ट्र,दि.१२(पीसीबी) – पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

एखादा मंत्री त्याच्या विधानसभा मतदारसंघातून पराभूत होतो तेव्हा त्या नेत्याला पुनर्जीवित करण्यासाठी उमेदवारी देणं साहजिक आहे. पण पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतलं नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, मी भाजप सोडून बराच काळ झाला आहे, त्यांनतर भाजपमध्ये नवं पर्व सुरु झालंय. पंकजा मुंडे यांना उमेदवारी का दिली नाही हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून डावलण्यात आलं आहे.