नोट छापण्याची मशीन विकण्याचे अमिष दाखवून पोलीसाच्या मुलाची ४६ लाखांची फसवणूक

0
510

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – नोट छापण्याची मशीन विकण्याचे अमिष दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची तब्बल ४६ लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटान दिल्लीमध्ये घडली.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईतून विमल राजेश पाटील आणि सुरज कुमार या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा बेपत्ता झाला असल्याचे समोर आले होते. यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु कऱण्यात आले. अखेर वृंदावन येथे मुलाचा शोध लागला. भीतीपोटी तो तिथे लपून बसला होता. चौकशी केली असता त्याने आरोपी विमल आणि सुरज या दोघांनी आपल्याला नोट छापण्याची मशीन विकण्याचे अमिष दाखवून ४६ लाखांची फसवणूक केल्याचे सांगितले. यावर या दोघा आरोपींना मुंबईतून अटक केली.

हे दोघे आरोपी हे एका गँगचा भाग आहेत. ही गँग देशभरात सक्रीय असून नोट छापण्याची मशीन विकण्याचे अमिष दाखवत लोकांची फसवणूक करते. एकदा पैसे मिळाले की गँग मशीन खराब झाली असल्याचं सांगत अजून थोडा वेळ देण्याची विनंती करते आणि पसार होते.