निगडी, हिंजवडीतून तीन दुचाकी चोरीला

0
235

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – निगडी परिसरातून एक आणि हिंजवडी परिसरातून दोन दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 5) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार भारतआप्पा शेरकर (वय 22, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी 3 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी पवळे उड्डाणपुलाजवळ टिळक चौकात पार्क केली होती. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

योगेश रामदास पायगुडे (वय 40, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोर रस्त्यावर पार्क केली. तिथून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

धीरज तानाजी माने (वय 25, रा. न-हे रोड, धायरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी 31 डिसेंबर रोजी बावधन येथील चेलाराम हॉस्पिटलसमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.