दुस-या मुलीसोबत लग्न झाले असते तर भरपूर हुंडा मिळाला असता, असे सासरच्यांचे विवाहितेला टोमणे..

0
399

दापोडी, दि. ६ (पीसीबी) – दुस-या मुलीसोबत लग्न झाले असते तर भरपूर हुंडा मिळाला असता. त्यांनी थाटात लग्न करून दिले असते, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीत दापोडी येथे घडला.

पती तेजस प्रताप सूर्यवंशी (वय 35), सासू (वय 55), मोठा दीर विजय प्रताप सूर्यवंशी (वय 36), जाऊ (वय 28, सर्व रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पैशांच्या कारणावरून तसेच आरोपी पती तेजस याचा विवाह दुस-या मुलीसोबत झाला असता तर भरपूर हुंडा मिळाला असता. त्यांनी थाटात लग्न करून दिले असते, असे वेळोवेळी घरातील कामकाज करण्याच्या कारणावरून फिर्यादी यांना टोमणे मारून शिवीगाळ व मारहाण केली. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.