निगडी साईनाथनगर येथे दिवसाढवळ्या तलवारीने वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न

0
1182

निगडी, दि. २१ (पीसीबी) – निगडी साईनाथनगर येथे मनसे गटनेता सचिन चिखली यांच्या कार्यालयासमोर आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास १५ ते २० टवाळखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन परिसरातील तब्बल १० ते १५ वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. घटनेची माहिती निगडी पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.