निगडीत तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार

0
810

निगडी, दि. १ (पीसीबी) – एका २१ वर्षीय तरुणीच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन तिघाजणांनी तीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना  निगडीतील टिळक चौकात घडली.

याप्रकरणी पीडित २१ वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.३०) सकाळी सातच्या सुमारास पीडित २१ वर्षीय तरुणी निगडीतील टिळक चौकातून पायी चालली होती. यावेळी रिक्षामधून आलेल्या तीघाजणांच्या टोळीने तिच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन तिचे अपहरण केले. तसेच अज्ञात स्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केला. निगडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.