निगडीत कोरोना वॉरियर्स डॉक्टर, नर्सेसचा सन्मान

0
404

निगडी, दि. 7 (पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा शर्मिलाताई बाबर यांच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून  कोरोना वॉरियर्स डॉक्टर, नर्सेसचा सन्मान करण्यात आला.

निगडी प्राधिकरणातील स्टर्लिंग हॉस्पीटलमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी स्टर्लिंग हॉस्पीटलचे डॉ. शैलेश अडवाणी, डॉ. करमळकर, डॉ. विनायक शिंदे, व्यवस्थापत माधुरी शेटे आदी उपस्थित होते.

मागील वर्षभरात कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना  आपण करत आहोत. या काळात डॉक्टर, नर्स यांनी केलेली रुग्णसेवा मोलाची आहे. त्यांच्यामुळे कोरोनापासून अनेक रुग्णांचे जिव वाचविणे शक्य झाले आहे. रात्रंदिवस मेहनत करून दक्षता घेऊन त्यांनी रुग्णांचे जिव वाचविले आहेत. ते समाजातील कोरोना वॉरियर्स आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला, असे यावेळी शर्मिलाताई बाबर यांनी म्हटले.