नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

0
451

नवी दिल्ली ,दि.९ (पीसीबी) – भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत.

खडसे आणि पवार यांच्यामध्ये  चर्चा सुरू आहे. खडसेंनी परवाच स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची शरद पवारांसोबतची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली. आपल्या मनातील खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे आज दिल्लीला पोहोचले. त्यावेळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ६ जनपथवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.