नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या!

0
381

मुंबई,दि.१५(पीसीबी) – मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेनं हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका २९ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. १५ एप्रिलच्या मध्यरात्री या महिलेने रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची आग्रीपाडा पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान आत्महत्या केलेली महिला वरळीची रहिवासी होती. नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २५ मध्ये तिच्यावर उपचार करण्यात येत होते. कोरोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला दम्याचा आजार असल्याची माहिती आहे.