नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेल्या “एक तास स्वच्छता” मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

0
144

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून देशात साजरा केला जातो. यावर्षी १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. त्यानुसार विठ्ठल उर्फ नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिवार चौक ते लिनियर गार्डन, पिंपळे सौदागर येथे एकाच वेळी १ तास स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने माजी विरोधीपक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी उपस्थिती लावत स्वच्छते मोहिमेत सहभाग घेतला.

स्वच्छता ही सेवा अभियांनातर्गत आजी माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सैनिक, मनपाचे कार्यकारी अभियंता नितिन देशमुख, उपअभियंता सुनिलदत्त नरोटे, आरोग्य अधिकारी प्रणय चव्हाण, कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड, विटकरी, कुणाल तसेच आयकॅान सोसायटी चे चेअरमन विनोद सुर्वे, राजवीर पॅलेस चे संतोष मिश्रा, विक्रम मोहीते, सतिन देसाई, द्वारका सनक्रीस्ट सोसयाटीचे दिपक कोठावदे, शिवआंगण सोसायटीचे सतिश डोगंरे, जयेश सरोदे, राष्ट्रवादी कॉग्रेस असंघटित कामगार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस मीनाताई मोहिते, गौरव शितोळे, चैतन्य थोरात, विशाल काळे, मच्छिंद्र काटे, भुषण काटे, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध सोसायटी चेअरमन, सभासद, बचत गटातील महिला भगिनी तसेच आरोग्य अधिकारी-कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी तसेच पिंपळे सौदागरमधील कै. अण्णासाहेब मगर मनपा शाळेतील शिक्षक व शालेय विद्यार्थी यांनी उपस्थिती लावत पथनाट्य सादर करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.