नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यु

0
456

शिरगाव दि. १ (पीसीबी) – आपल्या नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. ही घटना बेबडओहोळ (ता. मावळ) येथे सकाळी साडे आकरा वाजता घडली.

आर्यन दिपक आलम वय १३,रा बेबडओहोळ व संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे वय ३२ रा जवळ, मुळशी असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहे.घटनेनंतर तत्पर शिवदुर्ग, मारूंजी येथील पुणे विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल ,एनडीआरएफचे पथकाने शोध घेतला असता संतोषचा मृत्यूदेह लगेच सापडला तर सायंकाळी उशीरापर्यंत दुसरा मृत्यूदेह शोधण्याचे काम चालु होते.संतोष हा विवाहित असुन एक दिवसापूर्वी आपल्या नातेवाईकांकडे बेबडओहोळ येथे आला होता.घरातील पाणी संपल्याने नदीवर पोहण्यासाठी सर्वजण गेले होते.या घटनेमुळे आलम व घारे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली.