नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा जन्माचा दाखला नाही – छगन भुजबळ

0
747

मुंबई,दि.१(पीसीबी) – नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा जन्माचा दाखला नाही, असं वक्तव्य अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी (एनआरसी) या मुद्द्यांवरुन देशातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना, आदिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोक भटकंती करत असतात. त्यामुळे त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नसते. अशा लोकांकडे कागदपत्रं कोठून येणार? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

भुजबळ म्हणाले, आसामचं आपण उदाहरण घेतलं तर मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदूना नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही. मला जर विचारलं की, तुमच्या आई-वडिलांचा जन्मदाखला दाखवा तर ते मी देऊ शकणार नाही. तसेच माझ्याकडे सुद्धा खरा जन्मदाखला नाही.