नवी सांगवीतील साई चौकात मजा म्हणून टोळक्यांनी फोडली १० वाहने

0
498

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – दारु पिवून मजा म्हणून तीघा जणांच्या टोळक्यांनी रस्त्यावर उभे असलेल्या ८ कार आणि २ टेम्पोची तोडफोड करुन नुकसान केले. ही घटना सोमवारी (दि.१) रात्री उशीरा नवी सांगवीतील साई चौकात घडली.

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गणेश राजेश खरात (वय १९, रा. फेमस चौक, नवी सांगवी) या तरुणाला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार आकाश चौटमल आणि योगेश चौटमल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे सध्या फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तिघे आरोपी हे दारु पिले होते. त्यानंतर दारुच्या नशेत मजा म्हणून त्यांनी नवी सांगवीतील साई चौकात रस्त्यावर उभ्या असलेल्या ८ कार आणि २ टेम्पोची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गणेश याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार आकाश आणि योगेश हे दोघे फरार आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर साबळे तपास करत आहेत.