नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला पराभूत करा; पाकिस्तानी मंत्र्याचे आवाहन

0
397

दिल्ली, दि.३१ (पीसीबी) – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण थंडीत देखील चांगलंच तापले आहे.भाजपला रोखण्याचा प्रयत्न आप, काँग्रेस करीत असल्याने हि लढाई चांगलीच रंगतदार बनली आहे.

मात्र या राजकीय युद्धात पाकिस्तानची देखील एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांने नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला पराभूत करा असं आवाहन दिल्लीकरांना केले आहे. पाकिस्तानमधील मंत्री फवाद हुसैन यांनी ही मागणी केली आहे.